पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाने पी चिदंबरम प्रभावित; म्हणाले ‘भारताचे उत्तर हा एक मोठा संदेश’

P Chidambaram : पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. या दहशतवादी घटनेनंतर सर्वजण दहशतवाद्यांकडून बदला घेण्याची मागणी करत होते. अशा वातावरणात सरकारने मर्यादित लष्करी कारवाईचा मार्ग निवडून एक मोठे युद्ध टाळले आहे.
भारताने केलेली कारवाई अत्यंत मर्यादित आणि सुनियोजित होती. याचा उद्देश दहशतवादी संघटनांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेले हे पाऊल म्हणजे एक शहाणपणाचा निर्णय होता, असे माजी केंद्रिय मंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
शनिवारी संध्याकाळी युद्धबंदीची घोषणा झाल्याने भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव संपला आहे. आता पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यांमध्ये परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि दहशतवाद संपवण्यासाठी ते कोणतीही तडजोड करणार नाही हे सिद्ध केले. पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीच्या काळात, पंतप्रधान मोदींच्या धोरणांचे खूप कौतुक केले जात आहे. पी चिदंबरम यांनीही पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचे कौतुक केले आहे.
हेही वाचा – ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार; भारतीय वायुसेनेने केले महत्त्वाचे आवाहन
एका इंग्रजी दैनिकात प्रकाशित झालेल्या चिदंबरम यांच्या स्तंभात त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्व क्षमतेचे खूप कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला दिलेला प्रतिसाद बुद्धिमान आणि संतुलित असून या कृतीचे वर्णन पंतप्रधान मोदींचे एक शहाणपणाचे पाऊल असे केले आहे.
चिदंबरम यांनी त्यांच्या लेखात, ७ मे रोजी भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्याचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, भारतीय सैन्याची कारवाई कायदेशीर आणि लक्ष्याभिमुख होती. भारतीय लष्कराने त्यांच्या हवाई हल्ल्यादरम्यान लष्करी आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य केले नाही. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद आणि दार रेझिस्टन्स फ्रंट सारख्या दहशतवादी गटांचा पूर्णपणे नायनाट झाला आहे असे मानणे थोडे अकाली ठरेल