ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार; भारतीय वायुसेनेने केले महत्त्वाचे आवाहन

Opration Sindhoor : भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर अमेरिकेने मध्यस्थी केल्याने युद्धबंदी जाहीर करण्यात आली. शनिवारी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत युद्धविराम झाल्याची माहिती दिली. त्यानुसार काल (10 मे) सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य कारवाया थांबल्या आहेत. मात्र युद्धबंदीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार असल्याचं भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, अशी अधिकृत भूमिका भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत वायूदलाने आपली जबाबदारी चोखपणे बजावली आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन भारतीय वायुसेनेने केले आहे.
10 मे 2025 रोजी भारतासोबत शस्त्रसंधी केल्यानंतर अवघ्या तीन तासांत सीमेवर गोळीबार करत, पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पुन्हा एकदा सीमेलगतच्या चार राज्यांमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळाले. मात्र त्यांचा हा हल्ला भारतीय सेनेने परतवून लावला. त्यानंतर मुजोर पाकिस्तानला भारताकडून कडक इशारा देण्यात आला.
हेही वाचा – ‘इंदिरा गांधी होणे इतके सोपे नाही !’; रोहिणी खडसेंची पोस्ट चर्चेत
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पाकच्या हालचालींवर नजर असून, सेनेला कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती दिली होती. तसेच रात्री 11 वाजता पत्रकार परिषद घेत परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या, असं म्हणत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला खडसावलं होते.
तर दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धबंदी करण्याचे निश्चित झाले असले, तरी भारताने स्थगित केलेला सिंधू जल वाटप करार हा स्थगितच राहणार आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून भारताने पाकिस्तानबरोबरचा सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे. पण हा करार स्थगितच राहणार असल्याचे स्पष्टीकरण आज सराकरच्यावतीने देण्यात आले आहे