एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
![NIBR, College, Off Hotel, Management, Tree Plantation, Event Organisation,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/NIBR-College-780x470.png)
पिंपरी :
एनआरबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे वृक्षारोपण व पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नोवेल ग्रूपचे संस्थापक-अध्यक्ष व भाजपाचे राज्य सचिव अमित गोरखे यांचे वडील स्वर्गीय गणपतराव गोरखे यांच्या ११ व्या पुण्यस्मरण दिनाचे आणि राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, मा. खासदार अमर साबळे, पिंपरी विधानपरिषदेच्या आमदार उमाताई खापरे, सदाशिव खाडे, मा. महापौर श्रीमती माई ढोरे, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, केशव घोळवे, राजू दुर्गे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे, उपाध्यक्ष नंदा करे आणि शहर भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेच्या विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व तसेच पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धन किती गरजेचे आहे हे सांगण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभव फंड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व आभार मानले.