Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
ओबीसी आरक्षणाचा घोळ; छगन भुजबळांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
![ओबीसी आरक्षणाचा घोळ; भुजबळांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/ओबीसी-आरक्षणाचा-घोळ-भुजबळांच्या-इशाऱ्यानंतर-मुख्यमंत्र्यांनी-बोलावली-तातडीची-बैठक.jpg)
मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. यासोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसींच्या इंपिरिकल डेटा गोळा करण्याच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या मुद्द्यावर बैठक बोलावल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळही उपस्थित असतील.