H3N2 Influenza : गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, नीती आयोगाचं आवाहन
![Niti Aayog appeals to use masks in crowded places](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/H3N2-Influenza--780x470.jpg)
H3N2 व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा
H3N2 Influenza : गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन निती आयोगानं केलं आहे. भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे.
H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग दिवसोंदिवस वाढत चालला आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रूग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे.
H3N2 इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रूग्णांचं बारकाईने निरीक्षण करावं, असं सांगितलं आहे.
H3N2 व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा :
- फ्लूवरील वार्षिक लस घ्या.
- हात नियमितपणे स्वच्छ धुवा.
- शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
- आजारी व्यक्तींपासून दूर राहा.