फडणवीसांच्या तोंडात करोनाचे विषाणू कोंबणार म्हणणाऱ्या शिवसेना आमदाराला नितेश राणेंचं उत्तर; म्हणाले…
![Nitesh Rane's reply to Shiv Sena MLA saying that coronavirus will spread in Fadnavis' mouth; Said](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Nitesh-Rane-Sanjay-Gaikwad-1.jpg)
मुंबई |
मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झाला आहे असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर एकीकडे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. दरम्यान भाजपा नेत्यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले…हे या गायकवाडला कोण सांगेल. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर,” असं नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले..
हे या गायकवाडला कोण सांगेल..
पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..
जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर..
कुठे घालायची तिथे घाल..— nitesh rane (@NiteshNRane) April 18, 2021
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील संजय गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. “यथा सूडबुद्धी जनाबसेना पक्षप्रमुख तथा टुकार जनाबसैनिक…अरे मंदबुद्धी, ते जंतू नसतात विषाणू असतात,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
वाचा- प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास