पोलिसांनी आडवं येऊ नये, गृहमंत्री कोण आहे ते बघा; नितेश राणेंची पोलिसांना पुन्हा धमकी
Nitesh Rane | भाजप आमदार नितेश राणे यांनी इस्लापूर शहरात सभा घेतली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आतापासून इस्लापूरला सर्वांनी ईश्वरपूर बोलायला सुरू करा अशी सूचना दिली आहे. जसं औरंगाबादचे संभाजीनगर केलं तसेच इस्लमापुरचे ईश्वरपूरचा जीआर घेऊन मी पुन्हा इथे येईल असे नितेश राणे म्हणाले. यानंतर त्यांनी पोलीसांकडे रोख धरत पोलिसांनी आडवं येऊ नये, सरकार कोण आहे, गृहमंत्री कोण आहे ते बघा असा धमकीवजा इशारा दिला.
नितेश राणे म्हणाले, कुणाला सिंघम व्हायचे असेल तर होऊ द्या. मला पोलीस नोटीस पाठवणार हे मला माहित आहे. पोलिसांनी माझ्या आडवे जाऊ नये, सरकार कुणाचे आहे ते बघा, गृहमंत्री कोण आहे बघा असे राणे म्हणाले. लव्ह जिहादच्या तक्रारी घेतल्या नाहीत तर अधिकारी २४ तास पण खुर्चीवर राहणार नाही असा दम नितेश राणेंनी दम भरला.
हेही वाचा – तानाजी सावंत यांच्या विधानानंतर महायुतीमध्ये धुसफूस, अजित पवार गटाचा इशारा
पोलीसांना दिलेली खुर्ची हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी वापरा. कुराण मध्ये फक्त हिंदूंचा कट्टरवाद आहे मग त्यावेळी पोलीस आहे की आणखी कोण आहे हे तो जिहादी पाहणार नाहीत. पोलिसांवर हल्ला करण्याऱ्या जिहादीला मदत करणार का? असा पलट सवाल नितेश राणे यांनी पोलिसांना केला आहे. कोणीही पोलीस अधिकारी वाकड्यात जात असेल तर जाऊ नको बाबा खरंच माझ्या वाकड्यात जाऊ नको सरकार कोणाचे आहे बघ, अशी थेट चेतावणी नितेश राणे यांनी दिली आहे.
विशाळगडावरील अतिक्रमणवर विरोधक शिवप्रेमी कधीच बोलले नाही. विशाळगडावर हिरव्या चादरी टाकत आहे. महाराजांच्या गड किल्ल्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या नेत्यांना विशाळगड वरील जिहाद्यांचे अतिक्रमण दिसले नाही का? सिंधुदुर्ग मध्ये गेलेल्या नेत्यांना विशाळगड वरील अतिक्रम दिसत नाहीत का? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. विशाळगडावर बुलडोझर घेऊन जाऊ आणि जिहाद्यांची आतिक्रमणे काढून टाकू. आजपासून इस्लामपूर नव्हे तर ईश्र्वरपूर म्हणा, जो म्हणत नाही त्याला पाकिस्तान मध्ये पाठवा. देशाचे पंतप्रधान , राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री कडवे हिंदुत्ववादी आहेत. पोलिसांनी हे सगळे डायरीत हे लिहून ठेवा,म्हणजे तुम्हाला पुन्हा सूनवण्याची वेळ येणार नाही. आम्ही येत्या महिन्यात ईश्वरपूरचा जीआर घेऊन येतो, सरकार पातळीवर प्रकिया सुरु आहे अशी माहिती राणेंनी भाषणातून दिली.