Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#NisargCyclone: धोका काय?
आज, बुधवारी चक्रीवादळ अलिबागच्या जवळ येईल तेव्हा ताशी ११० ते ११० किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. या संपूर्ण काळात समुद्र खवळलेला राहणार असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तसेच या दरम्यान समुद्रात मोठय़ा लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्राकाठच्या क्षेत्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, विद्युत वाहिन्या, कच्ची घरे, झाडे यांना हानी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.