NIA ची ISIS विरोधात मोठी कारवाई; महाराष्ट्रात ४३ ठिकाणी छापेमारी, १५ जण ताब्यात
![NIA's major action against ISIS; Maharashtra 43 places raided, 15 people detained](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/NIA-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने ISIS विरोधात मोठी कारवाई केली आहे. आज सकाळी (९ डिसेंबर) महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ४४ ठिकाणी छापेमारी करण्यात आले आहे. कर्नाटमध्ये १, तर महाराष्ट्रात ४३ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे.
Of the total 44 locations being raided by the NIA since this morning, the agency sleuths have searched 1 place in Karnataka, 2 in Pune, 31 in Thane Rural, 9 in Thane city and 1 in Bhayandar. https://t.co/vKl7119DcV
— ANI (@ANI) December 9, 2023
हेही वाचा – तळवडे येथील आगीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईलःपालकमंत्री अजित पवार
माध्यमातील माहितीनुसार, या संपूर्ण कारवाईत सध्या १५ जण ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांची चौकशी करून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातही काही दिवसांपूर्वी अशीच कारवाई करण्यात आली होती. महाराष्ट्रात सतत अशाप्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. तरुणांना दहशतवाद्यांच्या कट्टर विचारसरणीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.