नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत भीषण अपघात!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Untitled-design-1-3-780x470.jpg)
Hemant Godse car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा नवी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला आहे. राजधानी दिल्लीतील बी डी मार्गावर अपघात झाल्याचं समोर आहे. या अपघातमध्ये हेमंत गोडसे थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने या अपघातात हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झालं आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेले नाही.
हेही वाचा – मविआतील दोन बडे नेते भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले..
हेमंत गोडसे दिल्लीत येत होते. बी डी मार्गावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झालेली नाही. या भीषण अपघातातून हेमंत गोडसे बचावले आहेत. गोडसे यांच्याशिवाय त्यांच्यासोबत असणारे सहकारीही सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे.