breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘नारायण राणेंची अवस्था पाण्याबाहेरील तडफडणाऱ्या माश्यासारखी’, जयंत पाटलांची टीका

मुंबई – भाजप नेते नारायण राणे हे सातत्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करत आहे. नारायण यांच्या या टीकेला आता जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ‘नारायण राणेंची अवस्था पाण्याबाहेरील तडफडणाऱ्या माश्यासारखी’ झाली असल्याची टीका केली आहे.

पाण्याच्या बाहेर असल्यावर माशाची जशी तडफड होते त्याप्रमाणे नारायण राणे यांची अवस्था झाली आहे. नारायण राणे यांना पुन्हा कधी सत्तेत जाऊन बसतो, असं झालं आहे. त्यामुळे काहीही झालं की ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करता. हाच न्याय लावायचा झाल्यास प्रथम उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, अशी जोरदार टीका जयंत पाटलांनी केली आहे.

जयंत पाटील यांनी सचिन वाझे आणि एनआयए प्रकरणावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, प्रकरणाचा संपूर्ण छडा लागला की अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे. केंद्रीय यंत्रणांनी तपास जरुर करावा. मात्र, वर्तमानपत्रांमध्ये अमक्याने हे केलं, ते केलं, अशा बातम्या सोडू नयेत.

विरोधी पक्षात बसण्याची सवय फडणवीसांनी अंगवळणी पाडून घेतली पाहिजे, असा टोला देखील यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांन लगावला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button