ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

४० वर्षांतील सर्वाधिक कर संकलन; महापालिकेची ऐतिहासिक करवसुली!

तब्बल 977 कोटी 50 लाख रुपयांचा कर वसूल

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 977 कोटी 50 लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. महापालिकेच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 1 हजार कोटींच्या जवळपास टप्पा गाठला आहे. हा कर संकलन विभागाचा एक माईलस्टोन ठरला आहे. 6 लाख 25 हजार मालमत्ता धारकांपैकी 5 लाख 11 हजार 154 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. महापालिका हद्दीत 6 लाख 25 हजार मालमत्ता आहेत. यापैकी 5 लाख 11 हजार 154 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी 816 कोटींचा कर वसूल केला होता. यंदा तब्बल 161 कोटींचा अधिक कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे.

यंदा कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांच्या टीमने मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे.

यावर्षी प्रथमच सिद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून बचत गट महिलांकडून बिले वाटप, डाटा अनालिसिस, जनजागृतीसाठी उत्तम क्रिएटिव्ह, सर्व सेवा ऑनलाईन करणे अशा विविध माध्यमातून नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचाच हा परिणाम आहे.
– शेखर सिंह, आयुक्त.

यंदा आम्ही प्रथमच मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली एकात्मिक पद्धतीने वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी दोन्हींमध्ये भरघोस वाढ झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेली जप्ती मोहीम आणि यंदा जप्ती केलेल्या मालमत्तांची प्रथमच राबवलेली लिलाव प्रक्रिया याचाही कर संकलनाला उपयोग झाला आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त.

माननीय आयुक्त यांचे कर संकलन विभागाचे व्हिजन आणि माननीय अतिरिक्त आयुक्त यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळे आम्ही हा टप्पा गाठू शकलेलो आहोत. येत्या वर्षभरात माननीय आयुक्त यांचे व्हिजन संपूर्णतः अंमलात आणण्याचा आमचा नम्र प्रयत्न राहील.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button