ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई विभागाच्या वतीने रविवारी 22 सप्टेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

मुंबई : संपूर्ण मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्हीही अशाच प्रकारे फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीने रविवारी 22 सप्टेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यामुळे लोकलच्या वेळेवरही परिणाम होत आहे.

मुंबई उपनगरीय मध्य रेल्वे मार्गावर काल 21 डिसेंबर आणि आज 22 डिसेंबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण आणि कल्याण- कर्जत विभागावर गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी एक विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि कल्याण ते कर्जत विभागात चालवण्यात येणाऱ्या अप आणि डाउन मार्गावरील गाड्यांवर परिणाम होणार आहेत. त्यासोबतच अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज घराबाहेर पडल्यानंतर गैरसोय टाळायची असेल तर मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबर रोजी रविवारी आणि सोमवारी रात्री २ ते ५.३० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान तिसरा नवीन पत्रीपुल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. डोंबिवली -कल्याण अप आणि डाउन धीमी लाईन (प्लॅटफॉर्मसह – क्रॉसओवर वगळता), डोंबिवली- कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओवर वगळता), पाचव्या आणि सहाव्या मार्गावर (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओवर वगळता) हा ब्लॉक घेण्यात येईल.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
ट्रेन क्र. 18030 अप शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र. 12810 अप हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस अनुक्रमे टिटवाळा आणि खडवली स्थानकांवर १५ मिनिटांनी नियमित केली जातील. ट्रेन क्रमांक 12132 अप साईनगर शिर्डी – दादर एक्स्प्रेसही उशिराने धावणार आहे.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन:

गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबवली जाईल.
गाडी क्रमांक 11020 वगळता सर्व सहाव्या मार्गावरील मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालतील.
उपनगरीय गाड्या शॉर्ट ओरीजनेट असतील
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- आसनगाव ही आसनगाव येथे ०८.०७ वाजता येणारी लोकल कल्याण येथून सुटेल. टिटवाळा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०५.४० वाजता येणारी लोकल ठाणे येथून सुटेल.
या गाड्या रद्द राहणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अंबरनाथ लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.०२, ०५.१६ आणि ०५.४० वाजता सुटणारी,
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कसारा लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०.०८ वाजता सुटते व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटणारी तसेच
अंबरनाथ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी अंबरनाथ येथून ०३.४३ आणि ४.०८ वाजता सुटणारी, कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी कर्जत येथून ०२.३० आणि ०३.३५ वाजता सुटेल आणि कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी कल्याण येथून ०४.३९ वाजता सुटेल
दक्षिण-पूर्व दिशेसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.३० वाजता सुटते.
ईशान्य दिशेसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१६ वाजता सुटेल.

टीप :मेल/एक्स्प्रेस गाड्या, विशेष गाड्या असल्यास, उशिरा धावणाऱ्या किंवा नंतरच्या तारखेला सूचित केलेल्या गाड्या देखील त्यानुसार नियमन/शॉर्ट टर्मिनेटेड केल्या जातील किंवा त्यांच्या संबंधित गंतव्यस्थानी उशीरा पोहोचतील.

प्रमुख ब्लॉक्स व्यतिरिक्त, इतर शॅडो ब्लॉक्स देखील कल्याण-अंबरनाथ विभागावर चालवले जातील.
हे ब्लॉक्स प्रवाशांच्या आणि देशाच्या हितासाठी केले जातात. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button