Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीकोकण विभागताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भ विभागव्यक्तीविशेष : आर्टिकल

MSEDCL: कर्तव्यदक्ष अधिकारी राजेंद्र पवार यांची महावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी नियुक्ती!

लोकाभिमुख प्रशासन, ग्राहकसेवा आणि मानव संसाधन व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी

मुंबई : महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांनी कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. ‘कर्तव्यदक्ष अधिकारी’ म्हणून त्यांनी महावितरणमध्ये ओळख आहे.

महावितरणमधील सेवेचा ३६ वर्षांचा अनुभव असणारे नवनियुक्त संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार हे मूळचे भऊर (ता. देवळा, जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. त्यानंतर १९८९ मध्ये तत्कालिन म. रा. विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वाशी (ता. पेण) येथे रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतीवर त्यांनी सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता पदी काम केले आहे.

सन २०११ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या काळात त्यांनी पेण, कळवण, नाशिक, पनवेल, कल्याण येथे काम केले आहे. तसेच अधीक्षक अभियंता म्हणून नागपूर व पुणे येथे काम केले आहे. तर गेल्या सव्वादोन वर्षांपासून पवार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी याआधीच्या सेवेत लोकाभिमुख प्रशासन, ग्राहकसेवा आणि मानव संसाधन व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे परिमंडलामध्ये मुख्य अभियंता म्हणून त्यांनी महसूलवाढ, नवीन वीजजोडण्या, छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. सोबतच कर्मचारी प्रशिक्षण व कार्यशाळा, कर्मचारी प्रोत्साहनपर विविध उपक्रम, कर्मचारीपाल्यांची अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया आदींना मोठा वेग दिला. त्यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण व विविध उपक्रमांमुळे पुणे लघु प्रशिक्षण केंद्राला सलग तीन वर्ष राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यापूर्वी पवार यांनी स्वतः ‘ऑन फिल्ड’ राहून मुंबईचा महापूर, ‘तौक्ते’, ‘निसर्ग’ चक्रीवादळ, ‘कोरोना’ आदी संकटांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे नेतृत्व केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button