Maharashtra Monsoon Update : केरळमध्ये आज मान्सून दाखल होणार, महाराष्ट्रात कधी?
![Monsoon will enter Kerala today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Maharashtra-Monsoon-1-780x470.jpg)
पुणे : सक्रीय झालेला मान्सून आज केरळात धडकण्याची शक्यता आहे. अंदमानमध्ये काही काळ रेंगाळल्यावर आता मान्सूनने वेग पकडलाय. मान्सून वेगाने नैऋत्येकडे सरकत असल्यामुळे आजच मान्सून केरळच्या किनारपट्टीला धडक देऊ शकतो. मान्सून ४ जूनला केरळात येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. तो अंदाज अचूक सिद्ध होण्याचे संकेत आहेत.
सक्रीय झालेला मान्सून मालदीव समुद्रातून दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाल्याचं आयएमडीने म्हटलंय. मान्सून आज केरळात दाखल झाल्यास कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार प्रिमान्सून सरी कोसळतील. तर महाराष्ट्रात १० जूनला मान्सून दाखल होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
हेही वाचा – तूर आणि उडीद डाळीच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल
गेल्या दोन दिवसांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागासह बंगालच्या उपसामगरातील दक्षिण भागात पोहोचले आहेत. त्यासोबत मौसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटांचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बरासचा भाग व्यापला आहे. त्यामुळे आज मान्सुन केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात १० जूनला मान्सून दाखल होणार आहे. तत्पुर्वी राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम येथे मान्सून पूर्व पावसांन हजेरी लावली आहे.