breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
Monsoon Update : मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात १४ जूनपर्यंत दाखल होणार
![Monsoon will enter all over Maharashtra by June 14](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/monsoon-update-1-780x470.jpg)
मुंबई : अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला गती दिली आहे. मान्सून पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकला असल्याने महाराष्ट्रात आगामी ३० तासांत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. नैऋत्य मान्सून पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकला आहे.
हेही वाचा – राज्य सरकारची मोठी कारवाई! राज्यातील १ लाख रेशन कार्ड रद्द होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/image-39.png)
मान्सून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात १४ जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.