मान्सून मुंबईवर रुसला; पुन्हा वाढणार उष्णतेचा कहर, ४० टक्के पाऊस झाला कमी
![Weather Update : मान्सून मुंबईवर रुसला, ४० टक्के कमी झाला पाऊस; पुन्हा वाढणार उष्णता](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Weather-Update-मान्सून-मुंबईवर-रुसला-४०-टक्के-कमी-झाला.jpg)
मुंबई : उन्हाचा तडाखा वाढत असताना मुंबईकरांना मान्सूनची प्रतिक्षा होती. पण एक दिवसांची हजेरी लावल्यानंतर मान्सून मात्र रुसला आहे. उष्मा आणि आर्द्रतेपासून थोडासा दिलासा देत मान्सूनने मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. पुढील ५ दिवस अत्यल्प पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली होती. पण मान्सूनचा वेग मंदावल्याने पुढील आठवडाभर मुंबईकरांना उष्मा आणि आर्द्रतेच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
मान्सूनचा मुंबईला दणका
शनिवारी मान्सूनने मुंबईत दणका दिला. मुंबईसह आसपासच्या भागात चांगला पाऊस झाला. IMD ने २४ तासांपूर्वी सांताक्रूझ इथं ५६.८ मिमी आणि कुलाबा इथं ६२.८ मिमी पावसाची नोंद केली आहे. मान्सूनच्या कमकुवतपणामुळे सांताक्रूझ इथं २३ मिमी तर कुलाबा येथे दुसऱ्या दिवशी ३७.४ मिमी पावसाची नोंद झाली. स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत यांच्या मते, कमी दाबाची पट्टा कमकुवत झाल्यामुळे मान्सूनचा वेग कमी झाला आहे.
मान्सूनच्या तुलनेत ४० टक्के कमी पाऊस
खरंतर, राज्यात १८ जूननंतर चांगला पाऊस अपेक्षित आहे. महेश यांच्या मते, मान्सून सुरू झाल्यापासून देशात ४० टक्के पाऊस कमी झाला आहे. पावसाच्या आगमनाने उष्मा आणि आर्द्रतेपासून सुटका होण्याची आशा होती. पण रविवारी सांताक्रूझ येथे ३३.२ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जूनमध्ये आतापर्यंत सांताक्रूझमध्ये ७९.८ मिमी तर कुलाबा इथे १००.२ मिमी पाऊस झाला.