मिशन विधानसभा: निशिकांदादा विजयाचा गुलाल उधळणार!
निशिकांत भोसले-पाटील समर्थकांना विश्वास : जनतेनंच ठरवलंय घड्याळ हाती बांधायचं

सांगली : इस्लामपूर मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत चुरशीने निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील व महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्यात थेट सामना आहे. साखर कारखाने, ऊस दर, ऊस बील, बेरोजगारी आदी मुद्दे प्रभावी ठरले आहेत. यावेळी परिवर्तनाची सुप्त लाट असून सामान्य जनता निशिकांतदादाच विजयी होणार अन विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास सोमवारी सकाळी प्रचार रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
इस्लामपूर मतदारसंघात १९७८ ची पुनरावृत्ती होणार असून निशिकांतदादांच्या विजयाने इतिहास घडणार असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांचा आहे. मतदारसंघात परिवर्तनाची सुप्त लाट आहे. नेते-कार्यकर्ते एका बाजूला सामान्य जनता दुसऱ्या बाजूला असे वातावरण आहे. १९७८ प्रमाणे या निवडणुकीत क्रांती घडणार असल्याचा विश्वास गेल्या दहा-बारा दिवसातील प्रचारसभांमधून महायुतीच्या नेतेमंडळींकडून केला गेला.
हेही वाचा – ‘मावळातील मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत’; आमदार सुनील शेळके
विकास टक्केवारीत अडकला…
एकास- एक लढत, विरोधकांची एकी, ऊसबिल न मिळाल्याने व इतर कारखान्याच्या तुलनेतील दरातील दरी यावरुन शेतकऱ्यांची असलेली मोठी नाराजी दूर करण्यात जयंत पाटील समर्थकांना अजूनही यश आले नाही, विरोधकांनी प्रचारात व सोशल मिडीया मध्ये घेतलेली कमालीची आघाडी यामुळे जयंत पाटील व समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. प्रचार सभांमधून जयंत पाटील गटातील नेतेमंडळी, कार्यकर्ते विकासाचे मुद्दे मांडत आहेत. गेल्या ३५ वर्षात मोठा विकास केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. पण, विरोधक हे मुद्दे खोडून काढत आहेत. त्यांचा विकास टक्केवारीत अडकला अशा प्रतिक्रिया प्रतिक्रिया निशिकांत पाटील समर्थकांच्या आहेत.
‘हातातोंडाला आलेला घास जाऊ देऊ नका’ अशी वेळ का आली…
‘चाळीस वर्षापुर्वी लावलेलं रोपटं बहरु लागलं आहे,आता घोटाळा करू नका, हातातोंडाला आलेला घास जाईल’ असे आवाहन आ.जयंत पाटील यांनी रविवारी आष्टा येथील प्रचार सभेत केले. या आवाहनाची मतदारसंघात एकच चर्चा आहे. माझी निवडणूक माझे कार्यकर्ते जिंकतात,मला प्रचाराला जावे लागत नाही, माझ्या विरोधात लढणारा उमेदवार पुढील निवडणुकीत माझ्या स्टेजवर असतो हा जयंत पाटील यांचा अहंकार संपला संपल्याची टीका निशिकांदादा समर्थकांनी केली आहे.माझ्या हातातोंडाला आलेला घास जाऊ देऊ नका म्हणत ते मतदारांना साद घालत आहे,पण, कष्टकरी शेतकर्याला ही वाटत होतं दिवाळी गोडधोड व्हावी, घरातील पोराबाळांना अंगावर नवं कापडं मिळावीत,घरातील लक्ष्मीला साडीचोळी मिळावी, हा गोड घास आणि क्षण तुम्ही ऊस बिल न देता हिरावून घेतला. आता तुम्हाला तुमच्या हातातोंडाला आलेला घासाची काळजी वाटु लागली आहे.तो घास तुम्हाला आम्ही बरा खाऊन देऊ अशी कुजबुज मतदारांच्यात ऐकायला मिळत आहे.





