मंत्री धनंजय मुंडे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी’, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 23, 2021
मागील वर्षी जून महिन्यात धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यांनी पुन्हा आपल्या कामास सुरूवात केली होती. त्यानंतर आता पुन्हा धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान, राज्यात काल 28,699 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्याची एकूण रुग्णसंख्या 25,33,026 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 132 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आणि 13,165 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 22,47,495 जण कोरोनामुक्त झाले असून 53,589 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सध्या 2,30,641 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.