MHADA Lottery 2024 | म्हाडाची लॉटरी जाहीर, कोणत्या गटात किती घरं, किंमत किती?
![MHADA lottery announced, how many houses in which group, how much the price?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/MHADA-Lottery-2024-780x470.jpg)
मुंबई | मुंबईमध्ये म्हाडाची नवीन लॉटरी जाहीर, म्हाडा मुंबई मंडळातर्फे २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर, ९ ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार. मुंबईतील पहाडी गोरेगाव अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.
म्हाडाकडून ज्या २०३० घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरं उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत ४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाइन अनामत रक्कम स्वीकारण्याची तारीख ४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे.
हेही वाचा – मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
लॉटरीमधील घरांच्या किंमती किती?
- पहाडी गोरेगाव : ३२ लाख ३६ हजार २०० रुपये
- अँटॉप हिल-वडाळा : ४१ लाख एक्कावन्न हजार रुपये
- कोपरी पवई : १ कोटी ५७ लाख रुपये
- कन्नमवार नगर-विक्रोळी : ३० लाख ते ५२ लाख रुपयां दरम्यान
- शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड : ५५ लाख ९२०० रुपये