पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
पुणे : काही तासांपूर्वीच पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन पोलिसांना होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आता पुणे शहर पोलिसांनी धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दारूच्या नशेत त्यानं फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर भंडारी असं फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तो रावेत येथील किवळे गावठाण येथील रहिवारी आहे. रावेत पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दारूच्या नशेत आपण पोलिसांना फोन करून धमकी दिल्याचं त्यानं तपासात कबूल केलं आहे.तसेच आपल्याकडे लोकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कॉल केल्याचं त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – हिरकणी कक्ष उभारणे अनिवार्य; राज्य शासनाचे संस्थांना आदेश
दरम्यान, या व्यक्तीने आज सकाळी फोन करत पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांची यंत्रणा तात्काळ कामाला लागली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपास सुरू करण्यात आला होता.