Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Maharashtra Weather | उकाड्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीने तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाला आहे. हवामान खात्याने आजही राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यातील विविध भागात आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात पुढील २-३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

हेही वाचा      –       माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपात प्रवेश करणार? 

विदर्भात कुठे पावसाचा इशारा? 

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button