breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपात प्रवेश करणार?

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. यानंतर त्यांनी दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र ते आजच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांचा आजच भाजपात प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश होईल. आज दुपारी १२ च्या दरम्यान हा पक्षप्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे भाजपात प्रवेश करणार आहेत.

हेही वाचा     –      हाडांच्या आरोग्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

अशोक चव्हाण यांची कारकीर्द कशी?

२८ ऑक्टोबर १९५८ या दिवशी अशोक चव्हाण यांचा जन्म मुंबईत झाला. अशोक चव्हाण हे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांनी एमबीए केलं. १९८५ मध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे चेअरमन झाले. तिथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली.

प्रकाश आंबेडकर यांचा जेव्हा त्यांनी निवडणुकीत पराभव केला तेव्हा अशोक चव्हाण हे अवघ्या ३० वर्षांचे होते. १९८७ ते १९८९ या कालावधीत ते खासदार होते. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. १९८६ ते १९९५ या कालावधीत अशोक चव्हाण हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. १९९९ मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button