मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची मोठी भूमिका
![Maratha reservation survey no extension](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Maratha-Reservation-780x470.jpg)
Maratha Reservation | राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक घडामोडी सुरु असतानाच आता मराठा आरक्षण सर्वेक्षणासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण सर्वेक्षणाला सरकारने मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यत संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करावं अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात आतापर्यंत २ कोटी १२ लाखांहून अधिक घरांचा सर्वे पूर्ण झाला आहे. या सर्वेक्षणाचा शुक्रवार अखेरचा दिवस असून या सर्वेक्षणाचा अहवान शनिवारी सुपूर्द करणं अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सचिव यांची ऑनलाईन बैठकही पार पडली. या बैठकीत संपूर्ण सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला आहे.
हेही वाचा – संजय गायकवाडांच्या ‘त्या’ टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करुन शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाकडे पाठवण्याच्या सूचनाही शासनाकडून करण्यात आल्या आहेत. मुदतवाढ मिळाली नसल्यामुळं आता मराठा समाज संघटनांकडून यावर नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल.