बीड दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
![Manoj Jarang's condition deteriorated, admitted to Chhatrapati Sambhajinagar hospital](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Manoj-Jarange-Patil-1-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत.
उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना याआधी गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ते सध्या उपोषणाला बसले नव्हते. त्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास झाल्याचा अंदाज आहे. मनोज जरांगे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांच्या समर्थकांकडून आणि समस्त मराठा समाजाकडून केली जात आहे.
हेही वाचा – श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि लढा उभा केला. मराठा आरक्षणासाठी त्यांनी उपोषणही केलं होतं. निवडणुकीच्या धामधुमीतही मनोज जरांगे राज्यांतल्या विविध भागांमध्ये दौरा करत आहेत. मनोज जरांगेंच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा लागू झाला. मात्र सगे सोयऱ्यांच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. मराठा समाजाच्या नागरिकांना हा मुद्दा मनोज जरांगे राज्यातल्या विविध भागांत जाऊन समजावून सांगत आहेत.