मनोज जरांगे पाटलांचं आंदोलकांना भावनिक आवाहन; म्हणाले,’मी मेलो तर..’
![Manoj Jarange Patil said that if I die, don't leave this government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Manoj-Jarange-Patil-1-1-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला होता.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना भावनिक आवाहन केलं आहे. ते म्हणाले, मी जर मेलो तर मला असंच सरकारच्या दारात नेऊन टाका. मी मेल्यावर या सरकारला धारेवर धरा. सरकारने आपल्याला येत्या १८ किंवा १९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण मुंबईला जाऊ. सरकार आपल्यासाठी इथे येत नाहीये, तर आपण तिथे जाऊ.
हेही वाचा – १५ फेब्रुवारीपासून सुरु होतोय ‘Anti Valentine Week’; पाहा वेळापत्रक
मी मेलो तर या सरकारला सोडू नका. मला तिकडे नेऊन टाका. आपण १८ फेब्रुवारीपर्यंत वाट बघू. सरकार आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी कधी करणार हे त्यांनी आधी आम्हाला सांगावं, त्यानंतर मी उपचार घेण्यास तयार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.