ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
NIA आणि ATS ला महाराष्ट्रातील काही तरुणांवर देशविघातकाचा संशय
छत्रपती संभाजीनगर, मालेगाव,जालना मधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्यावर संयुक्त कारवाई
![Maharashtra, Youth, Country, Fatal, Doubt, Chhatrapati, Sambhajinagar, Malegaon, Jalna, Joint, Action,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/nia-780x470.jpg)
महाराष्ट्र : छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालना येथे NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा ) आणि ATS ने संयुक्त कारवाई केली आहे. NIA आणि ATS च्या अधिकाऱ्यांनी काही तरूणांना ताब्यात घेतलं आहे. या तरूणांचा देशविघातक कृत्यामध्ये सहभाग असल्याचा संशय असून NIA आणि ATS कडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. NIA ने कारवाई करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही छत्रपती संभाजीनगर, मालेगावमधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
आज छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा आझाद चौक जवळील भागामध्ये कारवाई करण्यात आली. तर जालना आणि संभाजीनगरमधून 3 जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले हे तरूण देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती आहे.