Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Lockdown: महाराष्ट्रात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार
![The actual school will start from January 27 in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Varsha.jpg)
महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरं ही रेड झोन मध्ये आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे असं वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.