ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

लालबागचा राजाच्या दान पेटीत भरभरुन सोने, चांदी आणि रोकड

मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी 16 कोटींचा मुकूट लालबागच्या चरणी अर्पण

मुंबई : गणेश विसर्जनाची तयारी आता सर्वत्र सुरु झाली आहे. विसर्जनासाठी पोलीस प्रशानस सज्ज झाले आहे. मुंबईकरच नाही तर देशभरातून भाविक मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी आले होते. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी तर व्हीव्हीआयपी, सेलीब्रेटींची गर्दी झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी ताटकळत उभे राहवे लागले. भाविकांनी गेल्या आठ दिवसांत लालबागच्या राजाच्या चरणी भरभरुन दान दिले आहे. 15 सप्टेंबरपर्यंत भाविकांनी दिलेल्या दानाची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यात सोने, चांदी आणि रोकडचा समावेश आहे.

किती आले दान
लालबागच्या राजाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे दान भाविकांकडून येते. दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी 16 कोटींचा मुकूट लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला होता. आता आठव्या दिवसांपर्यंत आलेल्या दानाची मोजणी झाली आहे. त्यात आठव्या दिवशी 73 लाख 10 हजार रुपये रोकड आली आहे. तसेच सोने आणि चांदीही भाविकांनी अर्पण केले आहे. आठव्या दिवशी 199.310 ग्रॅम सोने आणि 10.551 ग्रॅम चांदी दान पेटीत आली आहे. आतापर्यंत एकूण 4 कोटी 15 लाख 20 हजार रुपये रोकड आली आहे.

असे येत गेले दान
गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशीच लालबागचा राजाच्या चरणी 48 लाख तीस हजार रुपयांचे दान आले होते. त्या दिवशी 255.80 ग्रॅम सोना आणि 5,024 ग्रॅम चांदी आली होती. दुसऱ्या दिवशी भक्तांनी 67 लाख 10 हजार रुपये रोकड दानपेटीत टाकले. तसेच 342.770 ग्रॅम सोने आणि चांदीही अर्पण केली. तिसऱ्या दिवशी 57 लाख 70 हजार रुपये रोकड आली होती. तसेच 159.700 ग्रॅम सोने आणि 7,152 ग्रॅम चांदी आली होती. लालाबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची स्थापना 1934 मध्ये झाली होती.

लालबाग राजाची दर्शन रांग बंद
लालबाग राजा सोमवारी चरणस्पर्शाची रांग सकाळी 6 वाजता बंद झाली. तसेच सोमवारी रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार आहे. लालबाग राजा विसर्जनाच्या तयारी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.लालबागच्या राजाच्या चरणी भाविकाकडून भरभरुन दान, इतके सोने, चांदी अन् रोकड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button