ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून, पैसे वाढत जाणार आहेत : एकनाथ शिंदे

विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार चौकार, षटकार मारणार

महाराष्ट्र : गरजू महिलांना मदत व्हावी या उद्देशानं लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरू केली. अंतरीम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. जुलैपासून या योजनेचा लाभ महिलांना मिळत असून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात अँडव्हास जमा करण्यात आले होते. या योजनेवरून सरकारवर टीकेची झोड देखील उठली, दरम्यान लाडकी बहीण ही योजना म्हणजे निवडणुकीसाठीचा जुमला असून निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार आहे, अशी टीका विरोधकांकडून सरकारवर होतं आहे. आता या टीकेला उत्तर देताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

लाडकी बहीण योजना विरोधकांना सलत आहे, कोणीही ही योजना बंद पाडू शकणार नाही. सरकारची कोणतीच योजना कधीही बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून, पैसे वाढत जाणार आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार चौकार, षटकार मारणार आहेत, विरोधकांचं सरकार येणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी देखील जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दावा केला होता. लाडकी बहीण योजना कोणीही बंद पाडू शकणार नाही. लाडक्या बहिणीचे पैसे वाढत जाणार, वाटत जाणार. आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबरचा हफ्ता मिळणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकीकडे ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार अशी चर्चा सुरू असताना आता मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button