जाणुन घ्या अजित पवारांचा काय असेल नवीनवर्षाचा संकल्प?

“आम्ही आमच्या पद्धतीने पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू”; अजित पवार
मुंबई : डिंसेबर महिना अखेर संपत आला आहे. उद्याापासुन नवीन वर्षाला सुरूवात होत आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण तयार आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला प्रत्येक जण काहीतरी संकल्प करत आसतो. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपला नवीन वर्षाचा संकल्प सांगितला आहे.
2022 हे वर्ष आमच्यासाठी समाधानकारक गेलं नाही. पहिले सहा महिने ठिक गेलं. मात्र, शेवटच्या सहा महिन्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. परंतु अशा घटना घडत असतात. लोकशाहीत जे प्रसंग समोर येतात त्याचा सामना करण्याचं काम राजकीय नेत्यांना करावं लागतं. त्यामुळे आता विरोधी पक्षाची जबाबदारी आमच्यावर आहे, येत्या वर्षात आम्ही ती योग्य पद्धतीने पार पाडू, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही कोणीही गोष्टी राजकीय दृष्ट्या न बघता ज्यात महाराष्ट्राचं हित असेल, त्या गोष्टीला आम्ही विरोध अजिबात करणार नाही. ज्या गोष्टी चुकीच्या होतील, त्या गोष्टी आम्ही सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून देऊ. तसेच येत्या वर्षात महाराष्ट्रावर कोणतंही संकट येऊ नये, करोना परत येऊ नये, यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असंही अजित पवार म्हणाले.
नवीन वर्षातच्या संकल्पाबाबत विचारलं असता, नवीन वर्ष येत असतं. आम्ही आमच्या पद्धतीने पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडून कोणतीही चूक होऊ न देण्याचा निश्चय आम्ही करू. तसेच आपल्या सद् विवेक बुद्धीला धरून ज्या गोष्टी करता येईल, त्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं अजित पवार म्हणाले. तसेच नवीन वर्ष सर्वांना सुख-समाधानाचं आणि भरभराटीचं जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.





