किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल, ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Kirit-Somayya.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. ट्विटरच्या माध्यमातून सोमय्या यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, या बंगल्यांच्या चौकशीसाठी किरीट सोमय्या आज १२ वाजता अलिबाग येथील CEO यांची भेट घेणार आहेत.
ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. ट्विटरच्या माध्यमातून सोमय्या यांनी हा सवाल उपस्थित केला
आहे. तसेच, या बंगल्यांच्या चौकशीसाठी किरीट सोमय्या आज १२ वाजता अलिबाग येथील CEO यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा ठाकरे आणि सोमय्या वाद पाहायला मिळणार आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या संबंधित 19 बंगल्यांवरून प्रश्न उपस्थि केले होते. अलिबाग येथील बंगले रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित अन्वय नाईक यांनी 2009 मध्ये हे बंगले बांधले. 2014 मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते विकतली घेतले, मात्र आता हे बंगले गायब केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.