जितेंद्र आव्हाडांनी ओबीसी समाजाविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचा राजीनामा घ्यावा : भाजप ओबीसी मोर्चाची मागणी
![जितेंद्र आव्हाडांनी ओबीसी समाजाविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचा राजीनामा घ्यावा : भाजप ओबीसी मोर्चाची मागणी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/WhatsApp-Image-2022-01-05-at-12.27.14-PM.jpeg)
पिंपरी । प्रतिनिधी
राज्याचे ग्रुहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाज हा ब्रहामण वाद्यांचा पगडा असलेला समाज असून, ओबीसी समाजाचा कुठलाही इतिहास नाही आणि ओबीसी समाजावर फार विश्वास सुद्धा नाही अस बेताल वक्तव्य केल्यानंतर भाजप ओबीसी मोर्चा आक्रमक झाला आहे. जितेंद्र आव्हाडांनी ताबडतोक ओबीसी बांधवांची माफी मागावी व आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असे पत्र पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश आण्णा टिळेकर, भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप ओबीसी मोर्चाने आंदोलन करुन हे निवेदन दिले.
सरकार मधले मंत्री ओबीसी समाजाविषयी असे वादग्रस्त विधान करतात मग सरकारमधले ओबीसी मंत्री गप्प का असा संतप्त सवाल भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष ऋषिकेश रासकर यांनी केला
जितेंद्र आव्हाडांनी लवकरात लवकर जर माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात संपुर्ण राज्यात निदर्शने केली जातील असेही ते बोलले. यावेळी प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विना सोनवलकर, प्रदेश सचिव मनोज ब्राह्मणकर, भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेश रासकर, योगेश अकुलवार, गणेश वाळुंजकर, जयश्री देशमाने, किरणताई पाचपांडे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते.