INDvsPAK : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापुर्वी भारतीय संघाला मोठा धक्क!
![indiavspakistan icc women t20 world cup match play sunday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/IND-vs-PAK-780x470.jpg)
रविवारी खेळला जाणार भारत-पाकिस्तान सामना
INDvsPAK : महिला टी-२० विश्वचषक आजपासून सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषकात भारतीय संघ आपला पहिला सामना रविवारी १२ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्स मौदानावर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी साडसहा वाजता सुरू होणार आहे.
भारतविरूद्ध पाकिस्तान सामन्यापुर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाची फलंदाज स्मृती मानधना ही दुखापतीमुळे १२ फेब्रुवारीला होणारा भारत-पाकिस्तान सामना खेळू शकणार नाही.
महिला भारतीय संघ आणि पाकिस्तान संघात आत्तापर्यंत एकूण १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने १० सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तान संघाने तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय महिला संघ विजयी होण्याची अधिक शक्यता आहे.
भारतीय संभाव्य संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), राधा यादव, यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, अंजली सरवानी, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, स्नेहा राणा आणि शिखा पांडे.