भारतातील पहिल्या खाजगी हील स्टेशन ‘लवासा’ची १८१४ कोटी रुपयांना विक्री
![India's First Private Heal Station Lavasa Sold for Rs.1814 Cr](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Lavasa-780x470.jpg)
पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. नैसर्गिक हिल स्टेशन आहेत. लोणावळा, खंडाळा या हिल स्टेशनवर नेहमी गर्दी असते. त्यामुळे पुणे जिल्ह्यात हिल स्टेशन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. आता या हिल स्टेशनची विक्री करण्यास राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. दरम्यान, पश्चिम घाटामध्ये बांधलेले लवासा हे खाजगी हिल स्टेशन विकले गेले आहे.
मुंबईतील डार्वीन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरने ते १,८१४ कोटी रूपयांना विकत घेतले आहे. NCLT ने २५ पानांचा आदेश पारित केला आणि १,८१४ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह ही योजना मंजूर केली. DPIL अनेक सेवांशी निगडीत आहे, ज्यात पायाभूत सुविधा, रिफायनरीज, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. लवासा विकत घेण्यासाठी यापूर्वी जेट एअरवेज आणि रिलायन्स कॅपिटलच्या बोली लावली होती.
हेही वाचा – अमित ठाकरेंचा ताफा अडवला, समृद्धी वरील टोलनाक्याची मनसैनिकांकडून तोडफोड
India's first private hill station, Lavasa sold for Rs 1.8k crore to to Darwin Platform Infrastructures https://t.co/xHtHwCqIkN
— Jayess (@Sootradhar) July 23, 2023
या रकमेमध्ये १४६६ कोटी रूपयांच्या निराकरण योजनेच्या रकमेचा समावेश आहे. या रकमेतून कॉर्पोर्रेट कर्जदाराला हप्त्यांमध्ये दिलेली रक्कम दिली जाईल. या रिझोल्युशन योजनेच्या देखरेखीसाठी एक समिती नेमली जाणार आहे. या निर्णयामुळे सध्या अडचणीत असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे.