Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

बिग बॉस १७ च्या विजेत्याला मिळणार ट्रॉफी, रोख रक्कमसह ‘हे’ धमाकेदार गिफ्ट

Bigg Boss 17 | बिग बॉस १७ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बिग बॉस १७च्या विजेत्याला काय बक्षीस मिळणार?

बिग बॉस १७च्या विजेत्याला ट्रॉफी, आलिशान कार आणि ५० लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. २८ जानेवारी २०२४ रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

हेही वाचा   –   ‘मशीद तोडून मंदिर बांधलं जात असेल, तर..’; उदयनिधी स्टॅलिन यांचं विधान चर्चेत

‘या’ स्पर्धकांमध्ये रंगणार चुरस :

अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान, औरा, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, मनारा चोप्रा, अनुराग डोभाल, ईशा मालवीय, समर्थ जुरेल, अभिषेक कुमार, रिंकू धवन आणि अरुण माशेट्टी या स्पर्धकांमध्ये चुरस रंगणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button