कोरोनाचा धोका वाढला! देशात गेल्या २४ तासांत १२,५९१ रूग्णांची नोंद
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १,१०० रूग्णांची नोंद
![India records 12,591 new cases and 10,827 recoveries in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/covid-19-1-1-780x470.jpg)
Covid-19 : देशात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. पण या वाढत्या रूग्णसंख्येसोबत लोकांचे मृत्यूचे आणि हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. त्यामुळे वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर घाबरून न जाता दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतात गेल्या २४ तासांत १२,५९१ नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. तर देशात सध्या ६५,२८६ सक्रिय रूग्ण आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १२,५९१ नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. तर देशात सध्या ६५,२८६ सक्रिय रूग्ण आहेत. राष्ट्रीय कोविड रिकव्हरी रेट ९८.७४ टक्के आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ५.४६ टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर ५.३२ टक्के आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४,४२,६१,४७६ वर पोहोचली आहे.
दिल्ली आणि महाराष्ट्रात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत १,७६७ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १,१०० रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.