भारताचा श्रीलंकेवर दोन धावांनी विजय; मालिकेत 1-0 ने आघाडी
![India beat Sri Lanka by two runs; 1-0 lead in the series](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Ind-vs-Sl-1-780x470.jpg)
दीपक हुड्डा आणि अक्षर पटेलची शानदार खेळी
मुंबई : भारतीय संघाने 2023 मधील पहिला सामना जिंकत नववर्षांची चांगली सुरूवात केली आहे. श्रीलंकेविरूद्ध भारताचा काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 चा सामना खेळाला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 ने आघाडी केली आहे. भारताच्या या नववर्षांतील पहिल्या विजयाने क्रिकेटचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघा श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरला होता. नाणेफेक गमावत भारतीय संघ मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेसमोर 163 धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात भारताने सलामीचे फलंदाज झटपट तंबूत गेले होते. मात्र, दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांच्या जोडीने या सामन्यात कमाल केली. भारतीय संघ 14 षटकात 5 विकेट गमावत 94 धावांवर खेळत होता. त्यावेळी मैदानावर हुड्डा आणि पटेल खेळत होते. या दोघांनी विकेट न गमावता भारताची धावसंख्या 163 पर्यंत पोहचवली.
या सामन्यात दीपक हुड्डाने 41 तर अक्षर पटेलने 31 धावांची खेळी केली. सलामवीर इशान किशन 37 धावा केल्या तर हार्दिकने 29 धावा केल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 45 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 चैकार आणि 3 षटकार लगावले. त्याच्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने 28 तर वनिंदू हसरंगाने 21 धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजी करताना शिवम मावीने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. खराब सुरूवात असुनही अक्ष पटेल आणि दिपक हुड्डा यांच्या भागीदारीमुळे भारतीय संघा हा सामना जिंकाला.