Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट, अर्जात चूक झाली तर……

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभं राहता यावं यासाठी राज्य सरकारने साधारण दीड वर्षांपूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. त्यांच्या खात्यात ही रक्कम दर महिन्यालाजमा होते. ही योजना सुरू झाल्यापासून नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. कधी पैसे, कधी ईकेवायसी तर कधी अजून काही… विरोधकांनी या योजनेवर बरीच टीकाही केली. मात्र राज्यातील कोट्यवधी महिलांना साधरण दीड वर्षांपासून दरमहा हक्काचे 1500 रुपये मिळत असून त्याचा महायुतीला विधानसभ निवडणुकीत मोठा फायदाही झाला.

या योजनेत अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यावर त्याा आळा घालण्यालाठी ईकेवायसी करण्याचे निर्देश देण्यात आले. कोटयवधी महिलांनी हे अपडेशन केले. आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक महत्वाची अपेडट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. त्याव कॉल करून त्यांच्या कोणत्याही शंकांचं निरसन करण्यात येणार आहे. आवश्यकता असेल तर लाडक्या बहिणींनी या या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असं आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

हेही वाचा –बजाज पुणे ग्रँड टूरने रचला आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेतला नवा इतिहास

मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट लिहून लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे अपडेट्स दिले आहेत. लाडक्या बहिणींसाठी विशेष हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे.

तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती- असं त्यंनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. मात्र त्यांना डिसेंबरा आणि जानेवारी 2026 या दोन महिन्यांचे पैसे, 3000 हजार रुपये अद्याप मिळाले नसल्याचं समोर आलं. यामुळे लाडक्या बहिणी आक्रमक झाल्याचंही पहायला मिळालं होतं. काही दिवसांपूर्वीच भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, वाशिम जिल्ह्यात लाडक्या बहीणी रस्त्यावर उतरल्या होत्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button