ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांसाठी लाईफ लाईन ब्लड सेंटरचा स्तुत्य उपक्रम; युवक सप्ताहानिमित्त मोफत रक्त पिशव्यांचे वाटप

पिंपरी-चिंचवड | स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘युवक सप्ताहा’चे औचित्य साधून लाईफ लाईन ब्लड सेंटर, सोमटणे फाटा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पिंपरी-चिंचवड महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना तातडीच्या परिस्थितीत रक्ताची कमतरता भासू नये, या उद्देशाने दि. २१ जानेवारी २०२६ ते ०२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोफत रक्त पिशव्या (Free Blood Units) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हेही वाचा     :            “तीन वर्ष तारीख पे तारीख!” सरन्यायाधीश यांच्या शिंदेंबरोबरच्या फोटोवर संजय राऊतांचा टोला

विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाची माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि गरजू विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लाईफ लाईन ब्लड सेंटरचे अध्यक्ष श्री. सुनील नाईकनवारे तसेच सचिव श्री. नामदेव पवार यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button