breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षांबाबत सोमवारी सुनावणी

नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (आयसीएसई) मंडळाच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ललयावेळी न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी सोमवारी घेण्यात येईल, असे सांगितले आहे.

याचिकेत परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी थेट रद्द करण्याची मागणी करण्यात आली करण्यात आली होती. सध्याची स्थिती परीक्षेसाठी योग्य नसून परीक्षा पुढे ढकलल्यास निकालास उशीर होईल. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासावर होईल. त्यामुळे परीक्षा रद्द करावी. विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुण देता येतील यावर लवकर विचार करण्यात यावा, जेणेकरून निकाल लवकरात लवकर जाहीर करता येईल, असे याचिकेत म्हटले आहे. आजच्या सुनावणीत न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्या ममता शर्मा यांना या याचिकेची प्रत यापूर्वी सीबीएसई आणि आयसीएसईच्या वकिलांना दिली आहे का? असा सवाल केला. त्यावर शर्मा यांनी आज वकिलांना आगाऊ प्रत पाठवतील असे सांगितले. त्यामुळे खंडपीठाने सुनावणी होण्यापूर्वी तुम्हाला हे काम करावे लागेल असे म्हटले आणि सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने असेही म्हटले की, एक जून रोजी सरकार परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेईल. सरकारचा निर्णय हा कदाचित तुमच्या बाजूने लागू शकतो. तुम्ही आशा बाळगू शकता, असेही याचिकाकर्त्यांना सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button