‘मी मोदींना शत्रू मानत नाही, पण…’, उद्धव ठाकरे काय म्हणाले?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Budget-2024-1-780x470.jpg)
रायगड : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची माणगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाजवर सडकून टीका केली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले “माझ्या लोकांवर ईडी, सीबीआय लावता. एवढी हिंमत आहे तर चीनवर सोडा ना… तो घुसलाय तिकडे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शत्रू मानत नाही. पण ते मला मानतात. त्यात माझी काय चूक?”, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. “२०१४ साली असं काय झालं की तुम्ही युती तोडली. लगेच सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व काय बाळासाहेबांचे धोतर आहे काय? आमच्याकडे काळी टोपी नाही. आमच्याकडे काळ्या मनाची माणसं नाहीत. आमच्याकडे भगव्या मनाची भगव्या टोपीची माणसं आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही काही बोलायचं नाही यांना हिंदुत्वावरुन? आमचं हिंदुत्व हे आला अंगावर तर घेतलं शिंगावर घेऊ. कुरुलकर ज्याने भारताची माहिती दिली त्याबाबत भाजप त्यांची भूमिका स्पष्ट करा ना. आम्ही आमचं हिंदुत्व काय आहे हे स्पष्ट केलं. चोरीचा मामला आणि जोरजोरात बोंबला. भारतीय जनता पक्षाला बाळासाहेब नेहमी त्यांना कमळाबाई म्हणायचे. मी यासाठी कमळाबाई बोलतोय कारण बाळासाहेबांनी सांगितलं. आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – Budget 2024 | अंतरिम बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळाले, वाचा सविस्तर..
“मुस्लिम लोक आमच्यासोबत आले. त्यांना आमचं हिंदुत्व पटलं. मुस्लिम बांधवांनी आज मला मराठीत असलेलं कुराण दिलं. लगेच टीव्हीवर बातम्या चालवल्या असतील. कुराणचं छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं संरक्षण केलं हे इतिहासात आहे. एक कोण तरी चमचा बोलला बिलकीस बानोची बाजू घेतली म्हणून… मुस्लिम आले तर आम्ही हिंदुत्व सोडलं. नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक पाकिस्तानात कापला नाही? ज्याने भारताची फाळणी केली त्या जिनाच्या थडग्यावर आम्ही डोकं ठेवली नाहीत?”, असे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.