Pune : बंदुकीचा धाक दाखवून पुण्यातील हॉटेल वैशाली केलं स्वतःच्या नावावर
![Hotel Vaishali in Pune was opened in his own name by showing fear of a gun](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/vaishali-hotel-pune-780x470.jpg)
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेल हे बंदुकीचा धाक दाखवून त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी स्वत:च्या नावावर करून घेतल्याचा आरोप मालकाच्या मुलीने केला आहे. तसंच, लग्नाआधी त्यानं बलात्कार केल्याचा आरोपही फिर्यादी महिलनं केला आहे. पती, दिर आणि सासू सासऱ्यांविरोधात महिलेनं पोलिसांत तक्रार दिली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजीत विनायकराव जाधव (वय ३८), अभिजित विनायकराव जाधव (वय ४०), विनायकराव जाधव (वय ६५),एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ३४ वर्षीय विवाहितेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. जून २०१८ ते आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा – ‘नाईक कुटुंब सामाजिक कार्यात अग्रेसर’; पीरपारसनाथ महाराज
आरोपी पती विश्वजीत याने फिर्यादीला २०१८ मध्ये घुले रोड येथील राहत्या घरी नेले आणि दारु व ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. इतक्यावरच न थांबता आरोपीने पिस्टलचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटर्नि स्वतःच्या नावावर करून घेतली.
फिर्यादीच्या कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या चार महागड्या कार परस्पर विकल्या. तसेच फिर्यादी यांचे एक कोटी ७० लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या कार फिर्यादी आणि त्यांचा भाऊ वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.