ठाण्यात मुसळधार पावसामुळे शाळांना उद्या सुट्टी जाहीर
मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
ठाणे : मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात शाळांना उद्या १८ आणि १९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने एक्सवरून अधिकृत पोस्ट करत सर्व माध्यमांच्या शाळांना या दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने ठाण्यासाठी १८ आणि १९ ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या सूचना काटेकोर पाळण्यास सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये १८ ते २२ ऑगस्ट या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. २० ऑगस्टला ऑरेंज अलर्ट तर कोकणातील काही भागांमध्ये रेड अलर्ट लागू राहणार आहे.
सर्व नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेचे उपाय करावेत, असे प्रशासनाचे आवाहन आहे.





