आळंदीत हिट अँण्ड रन, अल्पवयीन मुलाकडून लोकांना चिरडण्याचा प्रयत्न

Alandi Accident | गेल्या महिन्याभरापासून पुण्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आळंदी परिसरात असाच हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. मोटार वेगात चालवू नकोस असे सांगितल्याने झालेल्या वादातून १७ वर्षीय मुलाने भरधाव मोटार महिलेच्या अंगावर घातली. यात महिला जखमी झाली आहे. याबाबत नाजुका रणजीत थोरात (वय २४, रा. गणेशनगर, वडगाव घेनंद) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘अधिवेशन होताच अजितदादांचे आमदार पक्ष सोडणार’; रोहित पवारांचं विधान
आळंदी जवळील असणाऱ्या वडगाव घेणंद येथील व्हिडिओ समोर आला आहे. जुन्या भांडणाचा रागामुळे एका अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना भरधाव कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. हा अल्पवयीन कार चालक त्या महिलेस चिरडण्यासाठी आधी कार पाठीमागे (रिव्हर्स) घेऊन जातो. त्यानंतर भरधाव वेगाने चालवत काही नागरिकांना आणि त्या महिलेस चिरडण्याचा प्रयत्न करतो. या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. अंगावर काटा आणणार आणि मनात धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे.





