‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

Pakistan threat : अमरावतीच्या भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमकीचा काॅल आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोडे दिन की मेहमान.. जल्दी उडाने है वाले है’, अशा पद्धतीच्या नवनीत राणा यांना धमक्या आल्या आहेत.
याप्रकरणी नवनीत राणा यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, धमक्या नेमक्या कोठून येत आहेत, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्यांची पोलिसांनी गंभीर दखल घेत, तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने, भव्यतेने उभा झाल्याचा आनंद’; मुख्यमंत्री फडणवीस
नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या संदेशात म्हटले आहे की, ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढने वाली थोडे दिन की मेहमान है. जल्दी उडने वाली है.’ पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून या धमक्या नवनीत राणा यांना आल्या आहेत. त्यानंतर राणा यांच्याकडून ही माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. नवनीत राणा यांना आलेली ही धमकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना केंद्रीय यंत्रणेची मदत घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसी इथल्या रेडिमेड कपडे तयार कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या टेलरला थेट पाकिस्तानातून हा धमकीचा कॉल आला होता. देशाच्या दिल्लीत तीन ते चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. यानंतर आता नवनीत राणा यांना धमकीचा काॅल आला आहे.