Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यात आज गुलमोहर दिवस, विविध कार्यक्रमांचे आयोजन

सातारा : साताऱ्याच्या समाज जीवनाचा भाग बनलेला गुलमोहर साजरा होत आहे. यानिमित्ताने येथे सकाळी सात ते सायंकाळी चार या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती गुलमोहर परिवाराचे युवा संयोजक कबीर गायकवाड यांनी दिली आहे.

सव्वीस वर्षांपूर्वी सातारा शहरातील कालिदास पेट्रोल पंप ते पोलीस कवायत मैदान यादरम्यानच्या रस्त्यावर दुतर्फा असणाऱ्या गुलमोहराच्या झाडाखाली विविध कला, निवडक चित्रकार व रंगकर्मी यांच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन केले जात होते. प्रसिद्ध कलाकार, कवी, रंगकर्मी, चित्रकार यांनी या कार्यक्रमात अनोखे रंग भरत या सोहळ्याची व्यापकता वाढवली. सातारा जिल्ह्यातील अनेक चित्रकार, कलाकार या निमित्ताने या सोहळ्यात सहभागी होऊ लागले. गुलमोहर महोत्सव सेंट थॉमस चर्च सदर बाजार येथे सकाळी सात वाजल्यापासून रंगणार आहे. सकाळी सात ते अकरा चिमुकल्यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी आठ वाजता चित्रकार राहुल सुतार, चित्रकार सोहेल सय्यद, शिल्पकार रवि कुंभार यांचे चित्रकला आणि शिल्पकला प्रात्यक्षिके आणि बालगोपाळांची चित्रकला स्पर्धा होणार आहे.

हेही वाचा –  लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू

सकाळी नऊ ते बारा गिटार वादन आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. द्वितीय सत्र सायंकाळी चार ते सहा या दरम्यान आयोजित करण्यात आले असून, या सत्रात दरवर्षी काव्यवाचनाचे आयोजन केले जाते. त्यानंतर बक्षीस वितरण केले जाणार आहे. सर्व उपस्थित कलाकार यांनी आपापल्या सत्रानुसार कार्यक्रमासाठी सेंट थॉमस चर्च सदर बाजार येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक कबीर गायकवाड यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button