Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून समिती स्थापन

नाशिक : आगामी नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संपर्कासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारणीबाबतचा अभ्यास करण्यासाठी सात जणांची समिती गठित करण्यात आली आहे. संचालक, माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली हि ७ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संपर्कासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारणेबाबतचा अभ्यास करण्याचे प्रमुख काम समिती अध्यक्षांच्या निरीक्षणाखाली सदस्य करतील. ही समिती अभ्यास करुन पॉवर पॉईंट प्रेझेंन्टेशन (PPT) सह अहवाल शासनास सादर करणार आहे. मात्र,शासनास आवश्यकतेप्रमाणे सुधारणा सुचविण्याचे अधिकार राहतील.

हेही वाचा – Charholi TP scheme : मुख्यमंत्र्यांचा आदेश अन् प्रशासनाची “तालीम”

नाशिकमधील 2027 चा कुंभमेळा ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे. संपूर्ण कुंभमेळ्यामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः गर्दीचे आणि वाहतुकीचे नियोजन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केले जाणार आहे. कुंभमेळ्यासाठी भाविकांना उत्कृष्ट प्रकारची अनुभूती मिळेल अशा पध्दतीच्या प्रदर्शनी डिजीटल, ऑडिओ व्हिजवल्स, interactive, आर/व्हीआर अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

समितीमध्ये कोणाकोणाचा असणार समावेश?

संचालक, माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालय

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ,मुंबई

उपसचिव, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग

विजय पाटील, माहिती तंत्रज्ञान संचालनालय (DIT)

आलोक मिश्रा, माहिती तंत्रज्ञान संचालनालय (DIT)

विभागीय आयुक्त, नाशिक यांचे प्रतिनिधी

कक्ष अधिकारी (तांत्रिक)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button