Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही

मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर निशाणा, हिंदी अनिवार्य नाही

तिसऱ्या भाषेचा पर्याय दिल्याचेही स्पष्टीकरण

पिंपरी चिंचवड : हिंदी आधी अनिवार्य होती. पण, नवीन जीआरमध्ये ‘अनिवार्यता’ हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. आता मुलांना कोणतीही तिसरी भाषा शिकता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या असून, इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार ही भूमिका येग्य नसल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळय़ाला उपस्थिती लावल्यानंतर फडणवीस बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणातील हिंदीसंदर्भातील सरकारच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, की यापूर्वी सरकारने हिंदीला अनिवार्य केले होते, मात्र नव्या धोरणानुसार काल जारी करण्यात आलेल्या जीआरमध्ये ही अट रद्द करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाने तीन भाषांचे सूत्र स्वीकारले आहे. या सूत्रानुसार, मातृभाषा शिकणे अनिवार्य असेल. मातृभाषेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आणखी दोन भाषा शिकाव्या लागतील. ज्यापैकी एक भाषा भारतीय असणे बंधनकारक आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फक्त दोन भाषा ठेवाव्यात, अशी मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने तीन भाषांचे सूत्र कायम ठेवल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून समिती स्थापन

मराठी भाषेच्या सक्तीवर कोणतीही तडजोड नाही

कुठल्याही प्रकारची शाळा असो, मराठी अनिवार्यच असेल, त्याला पर्याय नाही. याचा अर्थ राज्यातील कोणत्याही शाळेत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याला मराठी भाषा शिकणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी सांगितले.

संतपीठात संतसाहित्याचा अभ्यास चार भाषांतून

श्रीक्षेत्र टाळगाव, चिखली येथे विकसित केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालन व सभागृहाचे लोकार्पणही या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभलेली आहे. संतपरंपरा जपण्याचे काम संतपीठात होणार आहे. संपूर्ण संतसाहित्य सीबीएसई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी या चारही भाषांमधून शिकविले जाणार आहे. विविध वाद्य वाजविण्याचे प्रशिक्षणही याठिकाणी देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group