breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

आनंदाची बातमी! जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरूद्ध करणार पुनरागमन

मुंबई : भारतविरुद्ध श्रीलंका यांच्यांत आजपासून टी-20 तर येत्या काही दिवसांत वन-डे सीरिज सुरू होणार आहे. त्यापूर्वीच क्रिकेटच्या चाहत्यांना चांगली बातमी मिळाली आहे. आता भारतीय संघातील वेगवान गोलंदाज संघात पुनरागमन करणार असल्याने भारतीय गोलंदाजी आणखी मजबूत होणार आहे.
श्रीलंकेविरूद्ध काही दिवसांमध्ये होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जातंय. कारण गेल्या 6 महिन्यांपासून जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखण्यामुळे मैदानाबाहेर असल्याने क्रिकेटपासून तो दूर होता. आता सध्या जसप्रीत बुमराह मैदानावर सराव करताना दिसून आल्याने त्याचं पुनरागमन होणार आहे.
आज नववर्षातील पहिला टी-20 सामना भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. यासाठी भारतीय संघाने चांगलीच कंबर कसली आहे. यानंतर येत्या काही दिवसांत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात असणार आहे.
जसप्रीत बुमराह नुकताच फीट झाला असल्याने 10 जानेवारी, 12 जानेवारी आणि 15 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळताना दिसणार आहे. जसप्रीत बुमराहला एनसीएने फिट म्हणून घोषित केलं असल्याने तो लवकरच मैदानावर उतरणार आहे. यामुळे भारताची डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग अधिक मजबूत होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button